छेडछाड म्हणजे काय?
मुली/स्त्रिया यांना शाळेत, कॉलेज, नोकरीला/कामधंदा किंवा कुठेही जाताना काही मुलं/पुरुष रस्ता अडवतात, अश्लील जोक करणे, शिट्ट्या, डोळा मारणे, पाठलाग करणे, मोबाईलवर फोटो काढणे, मुली/स्त्रियांना बघून गाणी म्हणणे-मोबाईलवर गाणी लावणे, मुली-स्त्रिया यांच्या दिसण्यावरून, कपड्यावरून कमेंट करणे, टक लावून पाहणे, स्त्रीच्या शरीराच्या कोणत्याही भागाला हात लावणे. अशा पद्धतीने मुली आणि स्त्रियांना छेडछाडीचे अनुभव येत असतात.
त्यासाठी अशा घटना आपल्याबाबत घडत असतील तर त्या व्यक्तीची लगेचच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलीच पाहिजे. पुढील धोके ही टळू शकतील.
शाळा-महाविद्यालयांची जबाबदारी – विद्यार्थिनी मंच, इ.
तक्रार नोंदविण्यासाठी कॉलेज/शाळा तक्रार समिती किंवा इतर कोणत्याही वैधानिक (कायद्याच्या चौकटीत असलेल्या) संस्थेकडे जा. अशा कोणत्याही वैधानिक संस्थेच्या अनुपस्थितीत. कॉलेजमधील महिला विकास कक्षाकडे (Women’s Development Cell ) संपर्क साधा किंवा शिक्षक / प्राध्यापक / मुख्याध्यापक किंवा शाळा प्राधिकरणाच्या इतर कोणत्याही प्रतिनिधी सोबत बोला/लिहून द्या. किंवा तुम्हाला सामाजिक संस्था माहित असेल तर त्यांची मदत घ्या.
दामिनी पथक? – महिलांच्या संरक्षणासाठी आता ‘दामिनी’ पथक’
दामिनी पथकाचे आवाहन – पुढील नंबरवरच फोन करा, घाबरू नका १०९१ या क्रमांकांवर फोन करा. १०० नंबरवरही फोन करू शकता. ते दामिनी पथकांना कळवतात, शिवाय मदतीसाठी गाडीही पाठवतात.
- शाळा, महाविद्यालय वा तत्सम सार्वजनिक ठिकाणी युवती व महिलांना टारगटांचा होणारा त्रास रोखण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आपल्या स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केल्या. नवी दिल्ली येथे युवतीवर झालेला बलात्कार व त्यानंतर तिचा मृत्यू, सुरगाणा तालुक्यात आदिवासी आश्रमशाळेत बारावीच्या विद्यार्थिनीवर झालेली बलात्काराची घटना, सातत्याने होणारी छेडछाड या पार्श्वभूमीवर, या पथकात १०० महिलांचा समावेश असून पहिल्या टप्प्यात त्यांना ‘मार्शल आर्ट’ प्रशिक्षण दिले जाणार आहे. साधारणत: महिनाभराचे प्रशिक्षण पथकातील महिला व युवतींना दिले जाणार आहे. त्यानंतर प्रशिक्षित महिला प्रत्येक शाळा व महाविद्यालयात जाऊन विद्यार्थिनींना प्रशिक्षण देतील. महिलांवरील अत्याचाराचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. महिलांनी स्वत:चे संरक्षण करण्यास स्वत: सक्षम व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
- त्याचाच एक भाग म्हणून ‘महिलांची सुरक्षितता व मदतीसाठी सदैव तत्पर’ अशा दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली. युवती वा महिलांनी अशा प्रकारांची माहिती दिल्यास टवाळखोरांचा दामिनी पथक त्वरित बंदोबस्त करेल, असे सुरसे यांनी नमूद केले. या शिवाय, महाविद्यालयांच्या परिसरात फिरून हे पथक टवाळखोरांना धडा शिकविणार आहे. सुनीता मिसाळ, सहायक पोलिस निरीक्षक, दामिनी पथक
- विद्यार्थिनींच्या अडचणी व रोडरोमिओंकडून होणारा त्रास विचारात घेऊन पोलिस ठाण्यांच्या स्तरावर दामिनी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
अमितेशकुमार, पोलिस आयुक्त