टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

ज्येष्ठ नागरिकांसाठी – ज्येष्ठ व्यक्तींना (स्वतःवर) होणारी हिंसा ओळखण्यासाठी प्रश्नावली

आजी-आजोबा, तुमच्या ओळखीच्या, नात्यातल्या किंवा अनोळखी व्यक्तीकडून असं केल जातं का? ही हिंसा आहे हे लक्षात घ्या. मदत मिळावा, सुरक्षित रहा!

  1. तुम्हाला घरातील कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही का?
  2. घरातील कोणतीच व्यक्ती तुमच्याशी बोलत नाही का? किंवा कामापुरतेच बोलते का?
  3. तुम्हाला न सांगताच घरातील सगळ्या व्यक्ती काही दिवसांसाठी बाहेर निघून जातात का?
  4. तुम्हाला घरात नक्की काय चाललंय याबाबत माहिती दिली जात नाही का?
  5. तुमच्याकडे असलेल्या पैशाची, दागिन्यांची सतत मागणी केली जाते का? किंवा तुम्हाला आत्ता त्याची काय गरज असं म्हणतात का?
  6. तुम्हाला जमत नसलेली (म्हणजे तब्यतीमुळे किंवा इतर कारणांमुळे) कामे सांगितली जातात का?
  7. तुमची तब्यत बरी नसली तरी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जात नाहीत का? वेळेत औषधं दिली जात नाहीत का?
  8. तुम्हाला वेळेत जेवण दिले जात नाही का? जेवण देतंच नाहीत का?
  9. तुमचा सतत अपमान केला जातो का ? टोमणे मारले जातात का?
  10. तुमच्या सहवासात घरातील कोणीही व्यक्ती थांबत नाहीत का?
  11. विनाकारण त्रास दिला जातो का?
  12. तुम्ही मागितलेल्या छोट्या-छोट्या गोष्टीं (उदा. काही खावंस वाटलं ते, कपडे इ.) ह्या शक्य असून दिल्या जात नाहीत का? खूप वेळाने/दिवसांनी दिल्या जातात का?
  13. कोऱ्या कागदावर किंवा काही लिहिलेल्या कागदपत्रांवर त्यामध्ये काय आहे हे तुम्हाला न सांगत, त्या कागदपत्रांवर सही/अंगठा घेतला गेला आहे का?
  14. जबरदस्तीने अथवा ब्लॅकमेल करून तुमच्या नावावर असलेली प्रॉपर्टी इतरांच्या नावांवर करायला सांगतात का?
  15. तुमच्याकडे आर्थिक जमा-पुंजी नसल्यामुळे तुम्हाला सतत त्रास देतात का? तुम्हाला घरात राहू नका असं म्हणतात का?
  16. तुम्हाला शारीरिक इजा होईल असे वर्तन करतात का? उदा. मारणे, केस ओढणे, ढकलणे, चिमटा घेणे, चावणे, लाथ मारणे, डोके आपटणे, गळा दाबणे इ.

आपल्यासोबत असे होत असेल तर कृपया सहन करू नका. आपल्या विश्वासातील व्यक्तींना सांगा, या वेबसाईटवर दिलेल्या हेल्पलाईन वर संपर्क साधा. मदत मिळवा.

लेखन –  विद्या देशमुख