तुम्ही किंवा तुमची/चा पाल्य अपंग असेल तर..
हे जरूर करा
- आपला फोन नेहमी आपल्याजवळ ठेवा. त्यातील महत्त्वाचे नंबर पाठ करा किंवा लगेच डायल करता येतील असे ठेवा.
- आपल्याला कोणाबद्दल अगोदरच संशय येत असेल, तर आपल्या जवळच्या/विश्वासातल्या व्यक्तीला तुम्हाला जे वाटतंय ते सगळ सांगा.
- आपल्या विश्वासातील व्यक्तीसोबत राहा किंवा अशाच व्यक्तींना आपल्या सोबत राहू द्या.
- तुमच्यासोबत कोणी हिंसा करत असेल, तर मदतीसाठी आरडाओरडा करा.
- तुमच्यासोबत कोणतीही हिंसा/लैंगिक शोषण केले असेल, तर विश्वासातील व्यक्तींना सांगा.
- विश्वासातील व्यक्तीला सोबत घेऊन अशा व्यक्तीची पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करा, किंवा १०० नंबर वर फोन करून कळवा.
- आपल्याला लागणाऱ्या गोष्टी नेहमी आपल्या जवळ ठेवाव्यात. (घरात आणि बाहेर जाताना ही.)
- घरातील सोयी-सुविधा आपल्याला वापरायला सोप्या/सहज होतील अशा कराव्यात (उदा. बाथरूम, टॉयलेट, किंवा घरातील इतर रचना.
- शक्य/जमत असेल तेवढं स्वावलंबी रहायलाही हवं. मात्र आवश्यक तेंव्हा उपयोगी सपोर्ट सिस्टिम ही असावी
- आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी वेळेत जेवण करा आणि औषधं असतील तर नियमित घ्या आणि डॉक्टरांनी सांगितला असेल तसा व्यायामही करा.
- आपल्या आवडीच्या गोष्टीत मन रमवा/छंद जोपासा.
- घरात २४ तासासाठी कोणाला मदतीला ठेवायचे असल्यास त्यांचे ओळखपत्र तपासून घ्या. आपल्याजवळ त्यांचे ओळखपत्र, कायमचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नं.) व फोटो ठेवून घ्या.
- मानसिक ताण-तणावासाठी समुपदेशकांची मदत घ्या.
हे कधीही करू नका
- कोणावरही लगेच विश्वास ठेवू नये आणि त्याच्या सोबत जाऊ/पाठवू नये.
- शक्यतो घरात राहताना किंवा बाहेर जाताना एकटे राहू नका.
- तुमचा कोणी गैरफायदा घेत/घेतला असेल, तर गप्प बसू नका आणि घाबरू नका.
- स्वतःला दोष देऊ नका.
- नकारात्मक विचार करू नये.
- समाजातील व्यक्ती काय म्हणतील याचा विचार करू नये.
- स्वतःच्या जिवावर बेतेल असं काही करू नये / स्वतःचा जीव धोक्यात घालू नये.
- स्वतःच्या तब्येतीची हेळसांड करू नये.