हिंसा कशाला म्हणायची?
पहा बरं खालील घटना आपल्या परिचयाच्या किंवा माहितीतील आहेत का?
- ८ वर्षाच्या आसिफावर सामूहिक बलात्कार…..
- कॉलेजवरून येताना चौकामध्ये मुलं त्रास देतात म्हणून ११ वीत शिकणाऱ्या राधाने कॉलेज सोडले….
- प्रेमाला नकार देणाऱ्या सुलभाच्या तोंडावर अॅसिड फेकले….
- आमटीत मीठ कमी पडल्यामुळे बायकोला मारहाण….
- सोफियाला पहिल्या दोन मुली झाल्यामुळे तिच्या सासरकडच्या लोकांनी तिच्याबरोबर बोलणे सोडले….
- बायकोवरील संशयामुळे तिला घराबाहेर पडण्यास मनाई…
- अमृताने प्रेमाला नकार दिल्यामुळे भर चौकात चाकूने हल्ला करून तिचा खून केला…
- सुनीताचे एका मुलावर प्रेम आहे म्हणून तिला घरातील एका खोलीत बंद केले.
- कमाल त्याच्या बायकापोरांच्या रोजच्या जगण्यासाठी पैसेच देत नाही.
महिलांना हिंसेच्या अशा अनेक घटनांचा सामना नित्य करावा लागतो. पेपर, टीवी अशा अनेक माध्यमातून या घटना आपण रोज ऐकतो, पाहतो आणि कधी कधी अनुभवतोही. दिवसेंदिवस स्त्रियांवरील हिंसेचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे हे ही आपल्या लक्षात येतेच आहे. वरील घटनाच पहिल्या तर त्यात हिंसेचे निरनिराळे प्रकार आपल्याला आढळतात.