अरुणाची गोष्ट (भाग 2)
तर मित्रांनो, मागील गोष्टीमध्ये आपण पाहिलं की कसं अरुणा ने कशी आपल्या आई-बाबांची स्मार्टफोनशी ओळख करून देऊन जणू एका वेगळ्याच दुनियेच दार उघडलं. त्याचा वापर करून आई दररोज नव-नवीन गोष्टी शिकत होती, नव- नवीन पाककृती, नव-नवीन बागकामाच्या पद्धती, शहरांमध्ये लोक सण कसे साजरा करतात हे ब्लॉग(Video Vlogs) च्या माध्यमातून ती बघत असे. जणू एक टीव्ही सिरीयल च मॉडर्न व्हर्जन ! तिच्या आईला आणि बाबांनाही शहरातल्या राहणीमानची हळूहळू कल्पना येत होती की शहर हे इथल्यापेक्षा किती वेगळंय.
तर अशाच एका दिवशी अरुणाच्या घरी पाहुणे येतात. ते पाहुणे म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून तिची ताई मिनू.
दोघी छान गप्पा मारतात. अरुणाची ताई गरोदर असते. संध्याकाळी जेवण आटोपल्यानंतर आई अरुणाला आणि सोहमला डोळ्याने कपाळाच्या आठ्या दाखवून झोपायचा इशारा करते.
मग मिनू आल्यावर आईच्या गप्पा चालू होतात, अचानक बोलता बोलता बाळाचा विषय निघतो मग त्या विषयावरून मिनू थोडी चिंतातूर होते. तेव्हा आई तिला विचारते, “काय ग मिनी, काय झालं” ? त्यावर मिनू म्हणते की होणाऱ्या बाळाबद्दल ती खूप चिंतेत आहे, तिला आधीच एक मुलगी आहे तर या वेळेस सर्वजण मुलाची आशा धरून बसले आहेत आणि जर मुलगी झाली तर काय करावं?
“कठीण आहे बाबा मुलीच्या जातीला ! आपण कसं भोगलं ते आपल्यालाच माहित.” असं आई म्हणते.
त्यावर मिनू म्हणते “सासरचे म्हणतात माझी तपासणी करू आणि मुलगी दिसली तर पाडू”.
आई म्हणते “गमतीनेच म्हणते, पण राहून राहून वाटत नाही मुलीचा जन्म किती अवघड ! जन्माच्या अगोदर पासूनच तिच्यावर काळाचा, लोकांचा, समाजाचा घेरा.”
मिनू म्हणते “जर मला मुलगी झाली तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न, मग शिक्षणाचा, अभ्यासात चांगली दिसली तरी किती शिकवले तरी दुसऱ्याच्या घरी जाणार आणि नाही शिकली तरी लग्नासाठी खर्च वेगळाच.
कमीत कमी एक मुलगा असला तरी सर्व ओझं कमी झाल्या सारख वाटतय बघ. मीच कशी बशी एक मुलगी सांभाळते मला दुसरी नको, बोलताना किती कडू वाटत असेल तरी सत्य परिस्थितीच वाटते मला” आणि बोलता बोलता हळूच तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते.
हे सगळं चालू असताना अरुणा जागी असते आणि ती पाणी पिण्यासाठी बाहेर येते तेव्हा तिच्या कानावरती तिचे शब्द पडतात. आणि त्या दोघींच्या मध्ये येते, आणि ती आज परत मुलगा मुलगी कसे समान असतात आणि त्याबद्दलची सर्व माहिती देते त्यावर मिनू म्हणते,”हो बाई बरोबर आहे पण तु जे म्हणतेस ते ! फक्त पुस्तकामध्ये वाचायला चांगल वाटतं. खरं जगामध्ये परिस्थिती खूप उलटी आणि बिकट आहे. समाजामध्ये राहायचं असेल तर काही गोष्टी आजच्या काळात जाणून बुजून डोळे बंद करून समजून घ्याव्याच लागतात.”
त्यावर अरुणा म्हणते की, “प्रत्येक जागेचा समाज हा वेगवेगळा मानला जातो, काही गोष्टी काही ठिकाणी बरोबर असतात पण याचा अर्थ असा नाहीये की त्या गोष्टी सर्व ठिकाणी सारख्या आहेत. बरोबर आहे काही गोष्टी आपल्या हातात नाहीयेत पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत जसं की चांगलं शिक्षण आणि समान वागणूक या तरी आपण तिला देण्याचा प्रयत्न करू शकतो ना! काय माहित दहा वर्षांत जग किती बदलेल आणि तुला माहितीये बाहेरच्या देशामध्ये ‘हाऊस हजबंड’ नावाची गोष्ट आहे ज्यात मुली काम करतात आणि घर नवरा सांभाळतो.”
आई, गमतीने म्हणते “हो ! हो ! तुला पण आपण हाऊस हजबंडच करू बर ! , आता जा आणि झोप. उद्या सकाळी शाळेला जायचं आहे तुला , शिक्षण घेतलं तरच मिळेल ‘हाऊस-हजबंड !
दुसऱ्या दिवशी अरुणा लवकर उठते, कारण तिच्या मनात चलबिचल चालू आहे . एक तर रात्रीचं आईबरोबरच झालेलं बोलणं आणि त्यानंतर तिच्या शाळेतील मैत्रीणीचा भेटण्यासाठी आलेला फोन! न जाणे तिने पण का बोलावलय ?