आपल्या मुलांबरोबर लैंगिक शोषण/हिंसा झाली आहे का? हे ओळखण्याबाबत, पालकांसाठी
पालक मित्रांनो, आपल्या मुलाबरोबर लैंगिक शोषण/हिंसा झाली आहे का? हे तुम्हाला खालील प्रश्नांवरून ओळखता येईल आणि आपल्या मुलांशी वर दिलेल्या मुद्द्यांच्या मदतीने बोलून नक्की काय झालं आहे हे माहित करून घेता येईल.
- तुमच्या मुलाच्या/मुलीच्या वागण्यात नेहमीपेक्षा खूप बदल जाणवत आहे का ज्यामुळे तुम्ही चिंतित आहात?
- तुमची मुलगी-मुलगा नेहमीसारखे वागत नसेल तर असे का वागत आहे?
- मूल कोणाशीच काही बोलत नसेल, एकटीचं बसून रहात असेल तर असं का होत आहे?
- मूल खूप घाबरलेलं, शांत-शांत दिसत असेल तर असं का होत आहे?
- मूल नेहमी ज्या गोष्टी करतं उदा. खेळणे, अभ्यास करणे, मित्रांसोबत बोलणे किंवा इतर अशा कोणत्याही गोष्टी करत नसेल तर असं का होत आहे?
- तिचे/त्याचे कशातच लक्ष लागत नसेल तर असं का?
- तिच्या- त्याच्या शरीरावर किंवा खाजगी अवयवांवर काही जखमा/खुणा दिसत असतील तर असं का?
- ती/तो स्वतःला एका खोलीत कोंडून घेत असेल तर असं का?
- कोणत्याच गोष्टीत मुलाला रस/आनंद/मज्जा वाटत नसेल तर असं का होत आहे?
याचा शोध घ्या. मुलांना दोष देऊ नका, त्यांना समजून घ्या, त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधा.
लेखन – विद्या देशमुख