टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

तज्ञांचे मार्गदर्शनपर व्हीडिओज – प्रास्ताविक

एकवीसाव्या शतकात आपला समाज भरपूर पुढे गेला आहे. मात्र, अजूनही भारतात समानतेवर आधारित समाज निर्माण करणं आपल्याला शक्य झालेलं नाही. स्त्री-पुरूष भेदभावामुळे स्त्री-भ्रूणहत्या, कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी अशा कित्येक समस्या आपल्यापुढे आहेत. याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे, स्त्रियांना आपल्या हक्कांची नसणारी जाणीव.

आपल्यावर होणारा अत्याचार कसा चुकीचा आहे, त्याबाबत आपण काय करू शकतो, हा अत्याचार कोणाच्या मदतीने आणि कसा थांबवू शकतो याबाबत महिलांना माहिती नसते. याच अडचणी सोडवण्यासाठी आय.एल.एस. विधी महाविद्यालय आणि स्विसएड यांनी संयुक्तरित्या तयार केलेल्या व्हॉयलन्स नो मोअर (www.violencenomore.in) या संकेतस्थळावर तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्त्रियांवरील हिंसा, त्याबाबत कायदा, स्त्रियांसाठीच्या योजना अशा कित्येक गोष्टींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी यासाठी ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. तुम्ही जर अशा हिंसेला बळी पडत असाल, किंवा तुमच्या संपर्कात एखादी पीडित महिला असेल, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. #nomoreviolence #stopchildmarriage #stopdomesticviolence #saynotoviolence #womenempowerment #socialissues #domesticviolence