स्त्रियांवरील हिंसेचे प्रकार
शारीरिक हिंसा, मानसिक किवा भावनिक हिंसा, लैंगिक छळ आणि नियंत्रण ठेवणे / बंधनात ठेवणे किंवा आर्थिक हिंसा अशा वेगवेगळ्या प्रकारात हिंसेची विभागणी केली जाऊ शकते.
शारीरिक हिंसा
दुस-या व्यक्ती वर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना ब-याच वेळा शारीरिक इजा केली जाते. त्यामध्ये पुढील प्रकारच्या हिंसेचा वापर करणे.
- ठोसा मारणे
- मारहाण करणे
- गळा दाबणे
- चटका देणे
- थप्पड मारणे
- वस्तू फेकून मारणे
- लाथ मारणे
- ढकलून देणे
- सुरा,चाकू, काठी,दाभण,भांडी,सळई सारख्या इतर हत्यारांचा वापर
- थुंकणे, ओरबडणे, चिमटे काढणे, चावणे.
व इतर अनेक प्रकार
मानसिक/भावनिक
मानसिक/भावनिक हिंसेमध्ये पुढील प्रकार दिसून येतात. यामध्ये व्यक्तीला वाईट व हीन वागणूक, व्यक्तीला जास्तीत जास्त परावलंबी व दुय्यम असल्याची जाणीव करून देणे.
- सतत टीका करणे
- चुका काढणे
- अपमान करणे
- स्वतःला, तिला किवा जवळच्या व्यक्तींना इजा करण्याची धमकी देणे
- आवडते कपडे, दागिने, वस्तूचे नुकसान करणे, मोडतोड करणे
- वारंवार शाब्दिक मार, अबोला धरणे
- माहेरच्या व्यक्तींबद्दल वाईट बोलणे
- सतत संशय घेणे, अविश्वास दाखवणे
- घरातून निघून जाण्यासाठी सांगणे.
व इतर अनेक प्रकार
लैंगिक छळ
शारीरिक बळाचा वापर करून किवा न करता स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध करावयास भाग पाडणे. यामध्ये पुढील प्रकारच्या लैंगिक हिंसा दिसून येतात.
- जबरदस्तीने संभोग
- बलात्कार
- विवाहा अंतर्गत बलात्कार
- छेडछाड
- इच्छेविरुद्ध शारीरिक स्पर्श
- जबरदस्तीने लग्न
- कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ
- सहेतुक लैंगिक भाषेचा वापर
- आई-बहीण वरून शिव्या
- लैंगिक अवयवांना इजा
- मोबाईल वरून अश्लील बोलणे व अश्लील चित्र, व्हिडिओ पाठविणे/दाखवणे
- फेसबुक, ईमेल, व्हाॅटस अप वरून मैत्री करून(प्रेमाचे खोटे नाटक करून) लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक छळ करणे
- पॉर्न फिल्म दाखविणे
- लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक सबंध ठेवणे
- स्त्रियांच्या इच्छेविरुद्ध / त्यांना माहित नसताना त्याच्याच लैंगिक अवयवांचे फोटो काढणे
व इतर अनेक प्रकार
नियत्रण/बंधन घालणे
Posted on Posted onBy Team VNM
पुरुषप्रधानतेतून सत्ता स्थापन करणे. या सत्तेचा वापर करून व्यक्तीवर नियंत्रण ठेवणे किवा व्यक्तीला बंधनात ठेवणे. यामध्ये पुढील प्रकारच्या हिंसा दिसून येतात.
- स्त्रीला घराबाहेर काम करण्यास मज्जाव
- एकाकी पाडणे, सतत देखरेख ठेवणे
- माहिती, पैसा, मालमत्ता, साधनसामुग्रीवर नियंत्रण ठेवणे
- ती पैसा मिळवत असेल, तर त्याचा स्वतः वापर करणे
- स्वतःच्या पायावर उभे राहायला आडकाठी आणणे
- तिच्याकडील दागिने, पैसे काढून घेणे
- हुंड्यासाठी छळ
- शिक्षण घेऊन न देणे.
- मुली-स्त्रियांना स्वतःच्या इच्छेप्रमाणे बोलायला, वागायला न मिळणे
- सोशल माध्यमांचा गैरवापर करून मुलींना/स्त्रियांना फसविणे/ब्लॅकमेल करणे इत्यादी.
- आर्थिक जबाबदारी आणि घरातील सर्वच जबाबदारी स्त्रियांवरच टाकणे
- लग्न थाटामाटात करून देण्याची आणि मुलीला सोने घालण्याची मागणी करणे.
व इतर अनेक प्रकार
आर्थिक हिंसा
Posted on Posted onBy Team VNM
स्त्रियांना आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र दिले नसल्यामुळे ती आर्थिक बाबीसाठी ब-याच वेळा दुस-यावर अवलंबून आहे, याची सतत जाणीव करून बंधनात ठेवणे/ त्रास देणे. यामध्ये पुढील प्रकारच्या हिंसा दिसून येतात.
- स्त्रीला पैसे कमावण्याचे स्वातंत्र्य नाही.
- तिच्या नावावर घर, जमीन, मालमत्ता नसणे.(सासरी आणि माहेरी दोन्हीकडे सारखीच परिस्थिती)
- तिने कमावलेल्या पैशांवर तिचा हक्क नसणे.
- तिने कमावलेले पैसे काढून घेणे.
- स्त्रियांना घर खर्चासाठी कमी पैसे देणे किंवा सतत हिशोब मागत राहणे.
- कामाच्या ठिकाणी स्त्रियांना कमी वेतन व पुरुषांना जास्त वेतन असणे.