टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

स्त्रियांवरील हिंसेचे विविध पैलू

आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीचा स्त्रियांच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम होताना आपण बघतो आहे. स्त्री कोणत्याही जात, धर्म, वर्ग, रंगाची असली तरी तिच्यावर समाजात हिंसा होताना दिसून येते. याला कारण म्हणजे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोनच मुळातच चुकीचा आहे. तिच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत स्वतःच्या कुटुंबात, समाजात, कामाच्या ठिकाणी, खाजगी, सार्वजनिक ठिकाणी, प्रवासात, मंदिरांमध्ये,  गावातील जत्रांमध्ये अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आणि परिस्थितीत तिच्यावर हिंसा होतात. या हिंसा आपण रोज बातम्या, न्यूज पेपर यामधून बघत असतो किंवा स्वतः अनुभवत असतो.

वरील सर्व चित्र बदलण्यासाठी फक्त स्त्रियांनी काळजी न घेता, समाज, शासन, पोलीस आणि कायदेशीर यंत्रणा या सगळ्यांनीच जबाबदारी घेणे गरजेचे आहे. स्त्री-पुरुष हा भेदभाव न करता, सर्व व्यक्तींसोबत माणूस म्हणून वागलं पाहिजे. सर्वाना समान संधी आणि समान अधिकार मिळाले पाहिजेत.

त्यासाठी या विभागात स्त्रियांवर वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या हिंसाबद्दल आणि त्या होऊ नयेत म्हणून काय काळजी स्त्रिया आणि सगळ्याच व्यक्तींनी घ्यायला पाहिजे आणि स्त्रियांकडे बघण्याचा एकूणच दृष्टीकोन कसा आहे व कसा असायला पाहिजे. याबद्दलची माहिती व लेख देणार आहोत.