टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

हिंसेचे स्त्रियांवर होणारे परिणाम

पुरुषाप्रधान संस्कृतीने स्त्रियांना नेहमीच दुय्यम दर्जा दिला आहे. त्यामुळेच स्त्रियांवर हिंसा होताना दिसते. या हिंसेतून स्त्रियांवर खूप वाईट परिणाम होताना दिसतात. या परिणामांमध्ये फक्त शारीरिकच नाही, तर मानसिक,  लैंगिक आणि इतरही परिणाम आहेत.

शारीरिक परिणाम

व्यक्तीवर होणा-या शारीरिक हिंसेचे परिणाम पुढीलप्रमाणे दिसून येतात.

  • हाड मोडणे, भाजणे, डोक्याला इजा, अॅसिड टाकून भाजणे, चाकूचे वार
  • अंतर्गत जखमा
  • अनिमिया होणे
  • डोकेदुखी
  • धडधडणे / एंग्झायटी.
  • उच्चरक्तदाब.
  • पी.सी.ओ.डी.,
  • फ्रस्ट्रेशन.
  • झोप लागत नाही.
  • शारीरिक अपंगत्व.
  • शारीरिक गंभीर आजार.
  • मृत्यू.

व्यक्तीवर होणा-या हिंसेचे परिणाम त्यांच्या संपुर्ण आयुष्यावर होताना दिसतात. त्यामुळे झालेल्या त्रासासाठी लवकर दवाखान्यात जा. आपल्यावर होणा-या  हिंसेला प्रतिकार करा आणि सुरक्षित रहा.

मानसिक परिणाम

व्यक्तीवर झालेल्या हिंसेचे जसे शारीरिक परिणाम दिसतात. तसेच मानसिक परिणामही होतात. ते व्यक्तीच्या बोलण्या-वागण्यात झालेल्या बदलामुळे समजतात.  हे परिणाम पुढीलप्रमाणे दिसून येतात.

  • आत्मविश्वास कमी होणे, न राहणे.
  • निर्णय न घेता येणे.
  • स्त्रियांचे मानसिक खच्चीकरण खूप होते.
  • असुरक्षित वाटणे.
  • कोणाबद्दल विश्वास न वाटणे.
  • नैराश्य, भीती, अपराधीपणा वाटणे.
  • खूप हायपर होतात.
  • सेल्फ बिलिफ सिस्टिम कोलमडते.
  • स्वनियंत्रण कमी
  • मुड-स्विंग होतात
  • संशयाच्या नजरेतून बघत राहणे.
  • कमीपणाची भावना वाढते.
  • आत्म्हत्येचे विचार.
  • नकारात्मकता वाढते.
  • अंगात येणे

हिंसेमुळे झालेल्या मानसिक परिणामासाठी लवकरात-लवकर समुपदेशक किंवा सायकॅट्रीस्टची जरूर मदत घ्या. आपल्यावर होणा-या हिंसेला प्रतिकार करा व सुरक्षित रहा.

लैंगिक परिणाम

व्यक्तीवर झालेल्या लैंगिक हिंसेमुळे त्यांच्या लैंगिकतेवर ही परिणाम होतात. ते पुढीलप्रमाणे दिसून येतात.

  • वेदना देणारा संभोंग
  • लैंगिक आजाराचे संक्रमण
  • जननेंद्रिय, ओटीपोट यांच्या वेदना
  • योनी आणि मूत्रमार्गात संसर्ग
  • नको असलेली गर्भधारणा
  • गर्भपात
  • वंध्यत्व
  • कमी वयात गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया.
  • लैंगिक अत्याचार.
  • लैंगिक इच्छा पूर्ण होत नाही किंवा कमी होते.
  • लैंगिकतेबद्द्ल घाण वाटते/ तिरस्कार वाटायला लागतो.
  • कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक हिंसेमुळे संधी सोडाव्या लागतात.

आपल्यावर झालेल्या लैंगिक हिंसेसंबंधी पहिले दवाखान्यात जा. तसेच लैंगिक तज्ञाची ही जरूर मदत घ्या. आपल्यावर होणा-या हिंसेला प्रतिकार करा व सुरक्षित रहा.

इतर परिणाम

व्यक्तीवर/ स्त्रियांवर होणा-या हिंसेचे परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर होताना दिसून येतात. ते पुढीलप्रमाणे आहेत.

  • स्त्रियांना जीवन जगणे, हिडणे, फिरणे अवघड होते.
  • मुली शिक्षण घेऊ शकत नाहीत.
  • कुटुंब उद्वस्त होते
  • स्त्रियांनाच घर, गाव, शहर सोडावे लागते
  • मुलींना/ स्त्रियांना त्यांच्या मनाप्रमाणे वागता येत नाही.
  • दुसऱ्याच्या गुलामीत, दबावाखाली राहावे  लागते.
  • सगळ्या बाजूने पिळवणूक होते त्यामुळे ती हतबल होते
  • बाई स्वतःला कमी लेखते.
  • मुलांच्या जबाबदारीचे प्रेशर.
  • वडिलांचं बघून मुलंही आई बरोबर वाईट वागतात.
  • स्वतःला महत्त्व न देणे, खूप त्रास करून घेणे.
  • या स्त्रिया कोणावरच विश्वास ठेवू शकत नाहीत.
  • आर्थिक स्वावलंबी होऊ देत नाहीत.
  • स्त्रीकडे माणूस म्हणून बघितले जात नाही.

आपल्यावर होणारी हिंसा सहन करू नका, प्रतिकार करा आणि सुरक्षित रहा.

हिंसेचा परिणाम बायांच्या संपूर्ण आयुष्यात खूप खोलवर झालेला दिसून येतो. ज्यातून बऱ्याच वेळा स्त्रिया हिंसेच्या परिणामामधून बाहेर पडू शकत नाहीत आणि त्यांना स्वतःचा जीव गमावावा लागतो.

म्हणूनच हिंसेचा सामना करणाऱ्या स्त्रियांनी आपल्यावर होणा-या हिंसेबद्दल बोलणं खूप महत्वाचं आहे. अशा व्यक्तीने/स्त्रीने हिंसेला विरोध करण्यासाठी विश्वासातील व्यक्तीशी बोलून त्या व्यक्तीची, सामाजिक संस्थांची, कायद्याची मदत घेऊन हिंसेला विरोध केला पाहिजे. इतर व्यक्तींनीही स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेला विरोध करण्यासाठी मदत करणे फार महत्त्वाची आहे.

त्यासाठीच हिंसा सहन करावी लागणाऱ्या व्यक्तीला/स्त्रीला आणि मदत करणारी व्यक्ती या सर्वाना मदत होणारी ही वेबसाईट आहे.

(संदर्भ – स्त्रियांवरील हिंसा –सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न लेखन – ऑड्री फर्नांडिस प्रकाशक – तथापि, वर्ष २००१)