टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

तुमचे मूल जर कुठल्या हिंसेचा सामना करत असेल, तर.. पालक म्हणून हे अवश्य लक्षात ठेवा.

हे जरूर करा

  • मुलावर विश्वास ठेवा.
  • मुलाबरोबर प्रेमाने बोला आणि वागा.
  • मुलं जे सांगतात ते शांतपणे ऐकूण घ्या.
  • मुलांना सांगा, त्यांच्या सोबत झालेल्या हिंसा/लैंगिक शोषण यामध्ये त्यांची काही चुक नाही.
  • मुलांना सांगा, त्यांना कोणी काहीही दिले किंवा कुठे जाऊया असे म्हटले, तर पहिले पालकांना सांगा.
  • मुलांच्या वागण्या-बोलण्यात जराही बदल जाणवला, तर त्याच्यांशी लगेच बोला.
  • मुलांबरोबर नेहमी मन-मोकळेपणाने संवाद साधा, त्यांच्याशी बोलत राहा.
  • मुलांचा तुमच्यावर विश्वास असेल, ते त्यांचे अनुभव तुम्हाला विश्वासाने सांगतील असे वातावरण घरात निर्माण करा.

हे कधीही करू नका

  • त्यांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होईल असं बोलू किंवा वागू नका.
  • मुलांवर ओरडू नका / रागावू नका/ शिक्षा करू नका.
  • मुलांना खोटं सांगतोस/बोलतेस असं म्हणू नका.
  • विशेषतः अशा प्रसंगी मुलांना दोष देऊ नका.
  • तुम्हाला खात्री किंवा विश्वास नसलेल्या जागी किंवा व्यक्तींसोबत (मग ती व्यक्ती कोणीही असो.) मुलांना सहसा सोडू नका.
  • मुलांच्या बदलेल्या वागण्याकडे दुर्लक्ष करू नका.
  • मुलांना भीती घालू नका/घाबरवू नका
  • मुलं तुमच्यापासून एखादी गोष्टी लपवतील, तुम्हाला कल्पना देणार नाहीत असे वातावरण घरात तयार होऊ देऊ नका.

लेखन –  विद्या देशमुख