टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

तुमच्या बाबतीत हिंसा होते आहे हे तुम्ही कसं ओळखाल?

आपली समाजरचना ही पुरुषप्रधान आहे. त्यामुळे कुटुंबात, समाजात स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान दिले जाते. यातूनच कुटुंबामध्ये, समाजामध्ये स्त्रियांवर, मुलांवर व वृद्ध व्यक्तीसोबत वेगेवगळ्या प्रकारे हिंसा होत असताना दिसून येतात. अनेकवेळा आपल्याला हे माहितही नसते की ही हिंसा आहे. त्यासाठी पुढे काही प्रश्न दिले त्याच्यावरून तुमच्यासोबत हिंसा होत आहे का? हे ओळखू शकता. तसेच हिंसा करणारी व्यक्ती ही आपल्या ओळखीची/नात्यातील किंवा अनोळखीही असू शकते. त्यामुळे खालीलपैकी एकाही प्रश्नाचे उत्तर जर ‘हो’ असेल तर आपल्यावर हिंसा होत आहे असे समजा!