माहिती गोळा करताना
कुठल्याही प्रकारची हिंसा समर्थनीय नाहीच. हिंसामुक्त जीवन जगणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. हिंसा घडल्यास त्याबद्दल दाद मागण्यासाठी योग्य माहिती गोळा करणे आवश्यक असते. यामुळे यंत्रणांना तपास करणे सोपे होते. आपण जर हिंसाग्रस्त व्यक्तीला मदत करत असाल किंवा कार्यकर्ते असाल तर खालील लेखांचा तुम्हाला उपयोग होईल. विविध प्रकारच्या हिंसेमध्ये पीडितेकडून कुठली माहिती कशा प्रकारे गोळा करायची याचा नमूना आणि प्रश्नावली दिलेली आहे. याचबरोबर कार्यकर्त्याने जमा केलेली माहिती बरोबर आहे ना याचीही खातरजमा करणे आवश्यक आहे. यंत्रणांना कुठल्याही प्रकारे खोटी किंवा अतिशयोक्तिपूर्ण माहिती न देण्याची खबरदारी कार्यकर्त्यांनी घेणे आवश्यक आहे.
सतत हिंसेला तोंड देणारी स्त्री अनेकदा नैराश्यात जाऊन आत्महत्येचे विचार करू लागते. खालील प्रश्नावली वापरून तिचा आत्महत्येचा विचार किती प्रबळ आहे आणि ती खरंच आत्महत्या करण्याची शक्यता किती आहे हे पडताळता येते. त्यासाठी इथे क्लिक करा
1. धोक्याची पातळी ओळखण्याचे ठळक प्रश्न
हिंसक व्यक्तीच्या सहवासात राहताना आपसूक स्त्रीच्या जीवाचा धोका वाढतो. हा धोका किती आहे हे दुसऱ्या व्यक्तीचे वर्तन, सवयी, इच्छा यावरून शोधता येते. खालील प्रश्नावली त्या उद्देशाने तयार केलेली आहे.
स्त्रीला मदत करताना तिच्याबाबत होणाऱ्या हिंसेचे स्वरूप आणि तीव्रता समजून घेणे गरजेचे असते. यातून तिच्यासाठी योग्य मदत योजना राबवता येते. हे समजून घेण्यासाठी खालील प्रश्नावली उपयोगी ठरेल.
2. जीवघेणी परिस्थिती जीवघेणी मारहाण
स्त्रीला मारहाण होऊ शकते का, तिच्या घरातील परिस्थिती, सहवासतील व्यक्ती तिला इजा करू शकतील का याची माहिती खालील प्रश्नावलीतून घेता येईल.
3. जीवघेण्या मारहाणीची शक्यता ओळखणे
यासोबतच मुख्यत्वे तिच्या जोडीदाराच्या हिंसक स्वभावाची कल्पना खालील प्रश्न विचारून घेता येते.
4. तुमच्या जोडीदाराची नवऱ्याची वृत्ती हिंसक आहे का हे ओळखणे
सतत त्रास, मानहानी आणि संघर्ष खूप परीक्षा पाहणारे असते. यात मनोधैर्य कमी झाल्यास स्त्रीच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ शकतात. खालील प्रश्नावलीतून स्त्री असे विचार करत आहे का हे शोधता येते. त्यासाठी इथे क्लिक करा.
5. स्त्रीच्या मनातील आत्महत्येचा विचार
तिच्या सासरच्या व्यक्तींची हिंसक वृत्ती ओळखण्यासाठी ही प्रश्नावली वापरा.
6. सासरच्या लोकांची वृत्ती हिंसेला पूरक आहे का
अशी हिंसक कुटुंबे ओळखण्यासाठी खालील दुवा उपयोगी ठरेल.
7. तीव्र प्रकारची हिंसा खालील कुटुंबामध्ये होऊ शकते
अनेकदा स्त्रीच्या लग्नाच्या वेळच्या परिस्थितीवर तिला नंतर सासरी मिळणारी वागणूक अवलंबून असते. पीडितेच्या दूरवस्थेसाठी तिच्या सासरच्या व्यक्तींची वागणूक कारणीभूत आहे का हे या प्रश्नावलीतून समजेल.
8. स्थळ स्वीकारताना सासरच्यांची मनस्थिती
पीडित स्त्री द्वितीय पत्नी असल्यास तिच्याबद्दल थोडी वेगळी माहिती गोळा करावी लागते. याबद्दल खालील प्रश्नावली वापरू शकता.